एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक ( Shiv Sainik ) हे दोन्ही बाजूंकडे दुभंगले गेले. काही शिवसैनिक उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या पाठीशी राहिले तर अनेकांनी एकनाथ शिंदे यांची साथ करण्याचे ठरवले. मावळ तालुक्यातही ( Maval Taluka ) हीच परिस्थिती असून काही पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदेंसोबत गेलेत तर काही ठाकरेंसोबत ठाम राहिलेत. अशात शिवाजी पार्क ( Shivaji Park ) मैदान शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या ( Uddhav Thackeray group ) शिवसेनेच्या ( Shiv Sena ) दसरा मेळावा ( Dasara Melava ) करिता मावळ तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी लावलेले होर्डींग अज्ञातांनी फाडले आहेत. त्यामुळे सध्या तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवसेनेच्या युवासेनेचे उद्धव ठाकरे गटाचे मावळ तालुक्यातील नेते अनिकेत घुले यांनी या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला असून एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत. ‘शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला शिवसैनिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहुन यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणुन अशी केवीलवाणी धडपड करत आहेत. पण असे बॅनर फाडले तरीही आम्ही ते परत तिथेच लावू’, असे घुले यांनी म्हटले आहे. ( Maval Shiv Sena Uddhav Thackeray group Dasara Melava Hoarding Tear Off )
शिवसेनेत सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट असे दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. अशात हे दोन्ही गट आम्हीच खरे शिवसैनिक आणि आमच्यासोबतच्या शिवसैनिकांची खरी शिवसेना असल्याचे ठासून सांगत आहे. तसेच या दोन्ही गटांमुळे यंदा प्रथमच शिवसेनेचे दोन स्वतंत्र दसरा मेळावे होत असून यातून खरी शिवसेना कुणाची ते जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
अधिक वाचा –
दसरा मेळाव्याला जायचंच..! मावळ तालुक्यातून ‘सावळा’ गावचा ‘मावळा’ पायीच निघाला शिवतीर्थावर
शिवतीर्थावर घुमणार आव्वाज ठाकरेंचा..! कोर्टाच्या निर्णयानंतर मावळमधील शिवसैनिकांचा जल्लोष, पाहा Video