व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, November 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज युवकांना मुख्यमंत्र्यांकडून 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द

सारसबाग जवळील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना सुपूर्द करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 2, 2023
in पुणे, महाराष्ट्र, शहर
Pune-Koyta-Attack

Photo Courtesy : Twitter / Shivsena Real


पुणे शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेजपाल जवळगे, हर्षद पाटील व दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सारसबाग जवळील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना सुपूर्द करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परिक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या समवेत पाठवला. पिडीत तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. पिडीत तरुणीला मदत करण्यासाठी तिच्या सोबत असलेल्या तिच्या मित्रालाही पंचवीस हजाराची मदत व होणाऱ्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. ( Reward of Rs 15 lakh From CM Eknath Shinde to Youth who Saved Life of Young Girl in Pune Koyta Attack )

यानंतर शिवसेनेच्या वतीने शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवित महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पुण्यात नोकरीच्या निमित्याने व अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्या असेही पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या. यावेळी सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, युवासेना राज्य सचिव किरण साळी, महिला आघाडी अध्यक्ष लीना पानसरे, पूजा रावेतकर, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, शहर संघटक प्रमोद प्रभुणे, शहर समन्वयक शंकर संगम, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, विकी माने, श्रद्धा शिंदे, सुदर्शना त्रिगुणाईत, श्रुती नाझीरकर, सुरेखा कदम, कांचन दोडे व अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– कौतुकास्पद! अनाठायी खर्चाला बगल देत वाढदिवसाच्या दिवशी जपले सामाजिक दायित्व
–  कुंडमळा इथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत सूचनांचे फलक, पर्यटकांना ‘हे’ खास आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

औंढोली गावातील बंगल्यात सापडले अजगराचे पिल्लू । Pavan Maval News

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
DM Breaking

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.