मोहितेवाडी (साते) इथे तालुका कृषि अधिकारी मावळ आणि मंडळ कृषि अधिकारी खडकाळा यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी, शेतकऱ्यांनी कृषी विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहाय्यक एस.एन. गडग यांनी केले. ( Seminar Organized At Mohitewadi In Maval Taluka To Inform Farmers About Various Schemes Of Agriculture Department )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मोहितेवाडी येथील संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये आयोजित सदर चर्चा सत्रामध्ये कृषी सहाय्यक एस. एन. गडग यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना, फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, महाडिबिटी कृषी यंञ आणि औजारे योजना, पी.एम. किसान योजना इत्यादी विविध कृषी योजनांची माहिती तसेच सुधारीत भात लागवड पध्दती बाबत मार्गदर्शन केले.
चर्चासत्राला शेतकरी प्रदिप शिवाजी मोहिते व्हा.चेअरमन कान्हे वि. सोसायटी (माजी सैनिक) झुंबर उभे (मा.ग्रा.पं.सदस्य) प्रकाश घोंगे, शंकर काळोखे, गंगाराम मोहिते, हिरामण मोहिते, काशिनाथ खानेकर, संभाजी मोहिते, आबाजी मोहिते, पांडुरंग बोलाडे, संतोष खानेकर, राजेश मोहिते, संतोष मांडेकर, रामदास काळोखे, भाऊ खानेकर, नंदकुमार मोहिते, विनायक खानेकर, शंकर निम्हण, प्रसाद मोहिते, तुकाराम मोहिते आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन
– इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी