इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळ सदस्यपदी रणजित रामदास काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रणजित काकडे हे आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याबरोबरच तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे. ( Ranjit Kakade Elected As Member Of Indrayani Vidya Mandir Sanstha Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रणजित काकडे यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, निरूपा कानिटकर, संजय साने, संदीप काकडे, युवराज काकडे, आर एम के ग्रुपच्या विपणन समितीचे (मार्केटिंग टीम)सर्व सदस्य, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, बी फार्मसी व डी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे, प्रा जी एस शिंदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अशोक जाधव, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मावळ तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी इंद्रायणी महाविद्यालयात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेंटर उभे करण्यात येणार आहे” असे रणजित काकडे यांनी सत्कारप्रसंगी बोलताना सांगितले.
अधिक वाचा –
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन
– इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी