पवन मावळ विभागासह मावळ तालुक्यातील अन्य भागातील नागरिक, व्यवसायिक यासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले पवना धरण आजघडीला 53.57 टक्के (दि. 22 जुलै 2022) इतके भरले आहे.
पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून मागील आठवड्याभरात सातत्याने वरुणराजा बरसत आहे. त्यामुळेच पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक वाढली असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ( Maval Taluka Rain News 53 Percent Water Storage In Pavana Dam Update )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या चोवीस तासात पवना धरण भागात 61 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यासह यंदा झालेला एकूण पाऊस 1171 मी.मी. इतका आहे. गेल्यावर्षी याच तारखेला ही स्थिती काही वेगळी होती. आज तारखेला पवना धरण 53.57 टक्के इतके भरलेले आहे, तर मागील वर्षी अर्थात 22 जुलै 2022 रोजी हाच पाणीसाठा 73.06 टक्के इतका होता. मात्र, मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे लवकरच पवना धरण भरेल, अशी आशा येथील नागरिकांना आहे.
अधिक वाचा –
– इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सदस्यपदी रणजित काकडे । Talegaon Dabhade News
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन