व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’, मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा सुरू

मावळ तालुक्यात शहर, ग्रामीण भागातील अनेक मंदिरांमध्ये सध्या पहाटेचा काकड आरती सोहळा सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 26, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
kakad-aarti

Photo Courtesy : Abhimanyu Shinde


Dainik Maval News : मावळ तालुक्यात शहर, ग्रामीण भागातील अनेक मंदिरांमध्ये सध्या पहाटेचा काकड आरती सोहळा सरु आहे. कोजागिरी पोर्णिमा झाल्यानंतर अश्विन महिन्यात काकडा आरती उत्सव चालु होतो. सुमारे एक महिना दररोज पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरात भजन मालिकामधील काकडा आरती भजन घेतले जातात.

काकड आरतीची परंपरा आणि महत्व –
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला प्रचंड महत्व आहे. फार पूर्वीपासून हि परंपरा चालत आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत असतो. कोजागरी पौणिमेपासून या काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. मावळ तालुक्यातही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. ( Warkari sampradaya kakad aarti )

चातुमार्सात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात. त्यांना उठवण्यासाठी ही काकड आरतीचे परंपरा असल्याचे बोलले जाते. आरती दरम्यान तीन मंगलाचरण, काकड आरतीचे अभंग, भूपाळ्याचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधाळा पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते. पांडूरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते.

मावळ तालुका हा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. मावळ तालुक्याला वारकरी संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आश्विन महिन्यात महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीचा गजर सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे. बहुतांश सर्वच ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये कोजागिरी पोर्णिमेनंतर काकड आरतीला सुरूवात होते. गावागावातील सार्वजनिक मंडळे, काकडा आरती सोहळा समिती, भजनी मंडळांसह गावांमधील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या पुढाकाराने काकडा आरतीचे नियोजन करण्यात येते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनील शेळके यांनी आतापर्यंत जाहीर केलेले तीन उमेदवार – पाहा एका क्लिकवर । Mla Sunil Shelke

Next Post

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे । DCM Eknath Shinde

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Everyone contribution is necessary to make Indrayani River pollution free said DCM Eknath Shinde

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे । DCM Eknath Shinde

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.