पवना नदी काठच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची सुचना देण्यात आलेली आहे. मावळ तालुक्यात पवनमावळ भागात असलेले पवना धरण आजमितीला (दिनांक 3 ऑगस्ट) 92 टक्के इतके भरलेले आहे. पवना धरणात पाण्याची आवक ही सातत्याने होत आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून अलर्ट करण्यात आले आहे. ( Pavana Dam Update Residents of Pavana Dam And River Banks Are Warned To Be Alert )
“आज दिनांक 03 ऑगस्ट 2023 रोजी पवना धरण 92.27 टक्के क्षमतेने भरले आहे. तरी वीज निर्मिती गृहाद्वारे पवना नदी मध्ये सकाळी 11 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती” अशी सुचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेली आहे.
पवना धरण 92 टक्के भरले….
मागील गेल्या 24 तासात पवना धरण आणि परिसरात 31 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. तसेच 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस हा 1893 मी.मी. इतका आहे. ह्यासह सध्या पवना धरणातील सध्याचा पाणी साठा हा 92.27 टक्के इतका झाला आहे. वेधशाळेने पुन्हा एखदा पावसाचा इशारा दिला असल्याने पवना धरण परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यास पवना धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल, अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता नागरिकांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ( Pavana Dam Update Residents of Pavana Dam And River Banks Are Warned To Be Alert )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा..अन्यथा..”, रविंद्र भेगडे यांचा आक्रमक इशारा
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme