व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक

तुंग परिसरात झाडीझुडपात तसेच डोंगराच्या कडी कपाऱ्यात भर पावसात मातीच्या कच्च्या रस्त्याने वाट काढत आरोपीचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 4, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
crime-arrested

File Photo


बॅनरवर छायाचित्र न लावल्यामुळे कोथरूड परिसरात तलवार फिरवत दहशत पसरविणाऱ्या ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. धर्मवीर प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अक्षय गायकवाड (वय 22 रा. शास्त्रीनगर) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून कुडले याच्यासह साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. ( accused who terrorized by swinging sword was arrested by pune police in maval )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत बॅनरवर फोटो लावला नसल्याच्या रागातून सराईत आरोपीने कोथरूड येथील शास्त्रीनगर भागात तलवार फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रकार केला होता. ओंकार ऊर्फ बाबा कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड,पुणे) याच्यासह एक जणावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार झाला होता आणि मागील दोन दिवसापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढून त्याला लोणावळा जवळील परिसरातील तुंग भागातील डोंगरातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

कारवाईत गुन्हे शाखेचे पोलिस उपयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्यासह पोलिस हवालदार संजय आढारी, पो.हवा किरण ठवरे, पो.ना. विजय कांबळे, पो.ना. प्रफुल्ल चव्हाण, पो.शि. अशोक शेलार, पो.शि अमोल वाडकर, पो.शि वैभव रणपिसे, पो.शि मनोज सांगळे, सुधीर सोनवणे, राजेंद्र मारणे, शंकर संपते, सचिन आहीवळे, धनंजय ताजने त्यांच्या पथकाने तुंग परिसरात झाडीझुडपात तसेच डोंगराच्या कडी कपाऱ्यात भर पावसात मातीच्या कच्च्या रस्त्याने वाट काढत आरोपीचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. ( accused who terrorized by swinging sword was arrested by pune police in maval )

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमिताने 1 ऑगस्ट रोजी मिरणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या बॅनरवर फोटो का लावला नाही म्हणून ओंकार ऊर्फ बाबा कुडले याने हातात तलवार फिरवली. तसेच तलवारीने साऊंड सिस्टीम ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो बाजूला सरकल्याने तो बचावला मात्र यात साऊंडचे नुकसान झाले. कुडले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या घटनेनंतर कोथरूड पोलिस ठाण्यावर नागरिकांनी मोर्चा काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कुरवंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना यादव बिनविरोध । Maval Politics
– महाराष्ट्राचा रानकवी हरपला..! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road


dainik maval jahirat

Previous Post

औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत

Next Post

राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा! पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणूकही लढवणार.. पाहा कोर्टाने काय म्हटलंय?

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rahul-Gandhi

राहुल गांधींना 'सर्वोच्च' दिलासा! पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणूकही लढवणार.. पाहा कोर्टाने काय म्हटलंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.