काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र गुजरात न्यायालयाच्या आदेशावर आज (4 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील राहुल गांधी परतण्याची शक्यता आहे. ( Modi Surname Case Rahul Gandhi To Be MP Again Can Contest Polls After Supreme Court Order )
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासाठी आज शुक्रवारचा दिवस अत्यंत आनंददायी ठरला आहे. मोदी आडनाव प्रकरणात सुरत कोर्टाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच सूरत कोर्टाच्या या निकालानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्य पदही गेले होते.
लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे त्यांना पुढची किमान सहा वर्ष निवडणुक लढवता येणार नव्हती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केली. मात्र ती फेटाळून लावण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्या प्रकरणावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे.
आ रहा हूं… सवाल जारी रहेंगे pic.twitter.com/pjewZg06gz
— Congress (@INCIndia) August 4, 2023
Truth Alone Triumphs!
We welcome the verdict by the Hon’ble Supreme Court giving relief to Shri @RahulGandhi.
Justice has been delivered. Democracy has won. The Constitution has been upheld.
BJP’s conspiratorial hounding of Shri Gandhi has been thoroughly exposed.
Time for…
— Mallikarjun Kharge (@kharge) August 4, 2023
सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच, “आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. ( Modi Surname Case Rahul Gandhi To Be MP Again Can Contest Polls After Supreme Court Order )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road
– तळेगाव दाभाडे, देहूरोड, आकुर्डी, चिंचवड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी भूमिपूजन
– भूमिपुत्रांसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! ‘मावळमध्येच स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा’, तहसीलदार आणि आमदारांना निवेदन