मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांच्यावतीने तालुक्यातील काही शाळांंमध्ये संगणक संचचे वाटप करण्यात आले. देशातील संगणक क्रांतीचे जनक स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला, असे राजेश वाघोले यांनी दैनिक मावळसोबत बोलताना सांगितले. पाचाणे, ओवळे आणि बेडसे या गावांतील शाळांमध्ये संगणक संच वितरित करण्यात आले. संगणक संच शाळेला भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये संगणकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी असलेली तळमळ दिसत होती. ( Maval Taluka Youth Congress President Rajesh Waghole Gifted Computer Sets To Schools )
मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आणि शाळेची गरज लक्षात घेऊन संगणक संच शाळांना भेट देण्यात आले. देशातील संगणक क्रांतीचे जनक स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील बहुसंख्य शाळांना संगणक संच भेट देण्याचा मनोदय यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांनी व्यक्त केला. तसेच राजेश वाघोले करत असलेल्या कार्याचे कौतुक करून हे कार्य युवक काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमानास्पद आहे, असे गौरोवद्गार त्यांनी काढले. तर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी ‘राजेश हा युवक काँग्रेसला भेटलेला कोहिनूर हिरा’ असल्याचे म्हटले.
कार्यक्रमाला पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, मावळ तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, मावळ तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष पवन गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रोहिदास वाळूंज, ज्येष्ठ नेते संदीप बुटाला, त्याचप्रमाणे युवा नेते स्वप्निल सावंत, सुनील येवले, गावचे उपसरपंच संदीप सोमनाथ इंगळे, पाचाणे गावचे सरपंच खंडू येवले, सुभाष येवले, माजी सरपंच अश्विनी सुभाष येवले, पै स्वप्नील सावंत, समीर येवले, विनोद पवार आदी मान्यवर आणि ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होता. ( Maval Taluka Youth Congress President Rajesh Waghole Gifted Computer Sets To Schools )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत
– तळेगाव दाभाडे, देहूरोड, आकुर्डी, चिंचवड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी भूमिपूजन
– भूमिपुत्रांसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! ‘मावळमध्येच स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा’, तहसीलदार आणि आमदारांना निवेदन