व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी

मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 5, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
farmer-died

Photo Courtesy : Chandrakant Asawale


मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील कांब्रे नामा गावातील तरुण शेतकरी श्रीकांत उर्फ भाऊसाहेब गणपत गायकवाड (वय 33) हा शेतात गवत काढायला गेला असता, तिथे विद्युतवाहिनी अंगावर पडल्याने विजेचा तीव्र झटका बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सहा महिन्याच्या आत मावळ तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभाराने दोन तरुण मृत पावले आहेत. काही दिवसांपूर्वीच पवनानगर भागात एका तरुण वीज कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

शेतकरी श्रीकांत गायकवाड हा नेहमीप्रमाणे शेतात गवत काढायला गेला होता. तेव्हा तिथे महावितरणची विज लाईन त्याच्या अंगावर पडली. विजेच्या प्रवाहाचा तीव्र झटका बसल्यावे सदर तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आज, शनिवारी (दिनांक 5 ऑगस्ट) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी श्रीकांत याच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अशा आकस्मिक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावावर देखील शोककळा पसरली आहे. ( farmer died after an electric line fell on him in maval taluka )

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती व्यवसायातून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. शेतात गवत काढताना अंगावर विद्युतवाहिनी पडली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जवळील एका आदिवासी व्यक्तीने सदरील घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तळेगाव इथे पाठवला. सदर प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली असून तरुण शेतकऱ्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. श्रीकांतला न्याय मिळवून देण्यासाठी गावकरी एकत्र आले आहेत. चिंचवड इथे छोटेमोठे काम करुन शेती करत कुटुंब चालवणाऱ्या तरुणाच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी निघून येणारी नाही.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– इंद्रायणी विद्या मंदिर तळेगाव दाभाडे – ‘क्रीडांगणाच्या जागेत बांधकाम असल्यास तातडीने थांबवण्याचे आदेश…’
– खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा
– ‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…


dainik maval jahirat

Previous Post

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

Next Post

अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा; सात दिवसात प्रस्तावाला मान्यता मिळणार – खासदार श्रीरंग बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maha-metro-pune

अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा; सात दिवसात प्रस्तावाला मान्यता मिळणार - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.