व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ब्रिटिशांची जुलमी राजवट दूर करुन भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणारे ‘क्रांतिकारक हेच देशाचे खरे हिरो’ – व्याख्याते विवेक गुरव

दिनांक 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशाने 'भारत छोडो' आंदोलन छेडले अर्थात चले जाव चा नारा दिला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 10, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
Vivek-Gurav-talegaon-maval

Photo Courtesy : Vivek Gurav


दिनांक 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशाने ‘भारत छोडो’ आंदोलन छेडले अर्थात चले जाव चा नारा दिला. त्यामुळे हा दिवस आजही देशात क्रांति दिन म्हणून पाळला जातो. यंदा 81व्या क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ परुळेकर विद्यालयात प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहासाचे अभ्यासक विवेक गुरव यांनी ‘क्रांतिकारकाचा पराक्रम’ हा विषय सर्व विद्यार्थ्यांपुढे उलगडला. ( 9 August Revolution Day History of Indian Revolutionaries Lecture In Rambhau Parulekar Vidyalaya Talegaon )

क्रांतिकारकांनी भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त करुन देण्यासाठी आपले बलिदान हसत हसत दिले. त्या क्रांतिकारकांच्या आठवणी जागृत करण्याचा आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचा दिवस म्हणजेच 9 ऑगस्ट अर्थात क्रांति दिन असल्याचे व्याख्याते विवेक गुरव म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये देशभावना रूजावी, आपल्या भारत मातेसाठी ज्या देशभक्त, क्रांतिकारक यांनी आपले बलिदान दिले त्यांना कधीही विसरता कामा नये, त्यांची देश निष्ठा ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करून देश रक्षणासाठी पुढे यावे, असे मार्गदर्शन व्याख्याते विवेक गुरव ( Lecture by Vivek Gurav ) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करुन देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्राचा प्रथम अभ्यास केला. यातील गनिमी कावा तंत्राचा अभ्यास केला. त्यांनी मोगलांना जसे सळो की पळो करून सोडले, तसेच ब्रिटिशांच्या तत्कालीन जुलमी राजवटीला भीक न घालता क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते. ब्रिटिश हे फक्त व्यापार करण्यास आले, शिवाजी महाराजांनी त्यांना तेव्हाही फक्त व्यापार करा असे बजावले होते. परंतू देशातील फितुरीमुळे आपल्या देश पारतंत्र्यात गेला आणि दीडशेहून अधिक वर्ष परकीयांचे राज्य आपल्या भूमीवर झाले. अखेर क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याचा सुर्योदय झाला, असे विवेक गुरव म्हणाले.

संस्थेचे विश्वस्थ नंदन बाळासाहेब रेगे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रामभाऊ इचकागदे आणि संकेत पोक्षे यांनी कार्यक्रमाचे अनुक्रमे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– विरोधात बातमी छापली म्हणून? पत्रकाराला बेदम मारहाण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ
– शिरदे गावात बिरसा ब्रिगेड मावळ आणि ग्रामस्थांकडून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष । World Tribal Day 2023

– भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप


dainik maval jahirat

Previous Post

ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ॲड. निवृत्ती फलके यांची नियुक्ती । Talegaon Dabhade

Next Post

पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lok-Adalat

पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.