दिनांक 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशाने ‘भारत छोडो’ आंदोलन छेडले अर्थात चले जाव चा नारा दिला. त्यामुळे हा दिवस आजही देशात क्रांति दिन म्हणून पाळला जातो. यंदा 81व्या क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ परुळेकर विद्यालयात प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहासाचे अभ्यासक विवेक गुरव यांनी ‘क्रांतिकारकाचा पराक्रम’ हा विषय सर्व विद्यार्थ्यांपुढे उलगडला. ( 9 August Revolution Day History of Indian Revolutionaries Lecture In Rambhau Parulekar Vidyalaya Talegaon )
क्रांतिकारकांनी भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त करुन देण्यासाठी आपले बलिदान हसत हसत दिले. त्या क्रांतिकारकांच्या आठवणी जागृत करण्याचा आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचा दिवस म्हणजेच 9 ऑगस्ट अर्थात क्रांति दिन असल्याचे व्याख्याते विवेक गुरव म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये देशभावना रूजावी, आपल्या भारत मातेसाठी ज्या देशभक्त, क्रांतिकारक यांनी आपले बलिदान दिले त्यांना कधीही विसरता कामा नये, त्यांची देश निष्ठा ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करून देश रक्षणासाठी पुढे यावे, असे मार्गदर्शन व्याख्याते विवेक गुरव ( Lecture by Vivek Gurav ) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करुन देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्राचा प्रथम अभ्यास केला. यातील गनिमी कावा तंत्राचा अभ्यास केला. त्यांनी मोगलांना जसे सळो की पळो करून सोडले, तसेच ब्रिटिशांच्या तत्कालीन जुलमी राजवटीला भीक न घालता क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते. ब्रिटिश हे फक्त व्यापार करण्यास आले, शिवाजी महाराजांनी त्यांना तेव्हाही फक्त व्यापार करा असे बजावले होते. परंतू देशातील फितुरीमुळे आपल्या देश पारतंत्र्यात गेला आणि दीडशेहून अधिक वर्ष परकीयांचे राज्य आपल्या भूमीवर झाले. अखेर क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याचा सुर्योदय झाला, असे विवेक गुरव म्हणाले.
संस्थेचे विश्वस्थ नंदन बाळासाहेब रेगे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रामभाऊ इचकागदे आणि संकेत पोक्षे यांनी कार्यक्रमाचे अनुक्रमे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– विरोधात बातमी छापली म्हणून? पत्रकाराला बेदम मारहाण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ
– शिरदे गावात बिरसा ब्रिगेड मावळ आणि ग्रामस्थांकडून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष । World Tribal Day 2023
– भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप