तळेगाव दाभाडे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. निवृत्ती फलके यांची तळेगाव ( Talegaon Dabhade ) स्टेशन विभागाच्या काँग्रेस (आय) पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर आणि मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले. तळेगाव स्टेशन येथे काँग्रेस (आय) पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये सदर नियुक्ती बाबतची घोषणा तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केली. ( Adv Nivrutti Phalke appointed as President of Senior Citizen Cell of Congress Party of Talegaon Station Division )
ॲड निवृत्ती फलके पश्चिम महाराष्ट्र वारकरी समुदायाचे अध्यक्ष आहेत. प्रदीर्घ राजकीय संघटनात्मक बांधणीचा ॲड. निवृत्ती फलके यांना अनुभव असून तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदाच होणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी व्यक्त केले आहे. बेरोजगारी भ्रष्टाचार व महागाई मणिपूर तसेच पंजाब व हरियाणा येथे होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या सर्व घटनांमुळे केंद्र शासनाच्या सरकार वरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हळूहळू उडत चालला असून, ऐतिहासिक अशा स्थिर काँग्रेस पक्षाला भविष्यामध्ये देशाला व राज्याला पुढे नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्यामुळे काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तालुक्यात प्रयत्न करणार असल्याचे ॲड. निवृत्ती फलके यांनी नमूद केले.
याप्रसंगी काँग्रेस नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, प्रांतिक सदस्य दिलीप ढमाले, काँग्रेस तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी मार्गदर्शन केले. ॲड निवृत्ती फलके यांच्या निवडी बाबत आनंद व्यक्त केला. काँग्रेस मावळ तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तीकोने, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तळेगाव स्टेशन कार्याध्यक्ष योगेश पारगे, तळेगाव स्टेशन युवक अध्यक्ष समीर दाभाडे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळूंज, तळेगाव युवक कार्याध्यक्ष राम शहाणे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. ( Adv Nivrutti Phalke appointed as President of Senior Citizen Cell of Congress Party of Talegaon Station Division )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतवर आता ‘प्रशासक’राज, नगराध्यक्ष-नगरसेवक बनले ‘माजी’ तर सीईओ बनले ‘कारभारी’ । Vadgaon Maval
– मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षे! पवनानगर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण, भाजपकडून जलवाहिनीबद्दल भुमिका स्पष्ट
– भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप