व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काका-पुतण्याच्या भेटीने ठाकरे सावधान! पवारांविरोधात मावळात ‘पॉवर’ दाखवणार? वाचा नेमकं काय घडलंय…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा विचार आणि परवानगी न घेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले, असे चित्रल सध्या दिसतंय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 16, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
maval-politics

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा विचार आणि परवानगी न घेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले, असे चित्र सध्या दिसतंय. त्यांच्या ह्या निर्णयाने सर्वात मोठा धक्का हा महाविकासआघाडी आणि उद्धव ठाकरे यांना बसला आहे. अशात मागील काही दिवसांपासून काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय संभ्रम वाढला आहे. अशात सावधानता बाळगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मिशन 48 सुरु केले आहे. ( Maval Lok Sabha Constituency Shiv Sena Uddhav Thackeray Vs Ajit Pawar Sharad Pawar Nationalist Congress Party )

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यानुसार आता पक्षाकडून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दिनांक 18 ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे.

मावळ मतदारसंघात तसे पाहता 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा शिवसेनेचाच खासदार आहे. परंतू आता सध्याचे तिसऱ्या वेळीचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत म्हणजेच ‘खऱ्या’ शिवसेनेसोबत आहे. परंतू शिवसेनेचाच पारंपारिक मतदारसंघ असलेल्या मावळसाठी महाविकासआघाडीतील ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील तितकाच आग्रही असणार असून त्यांच्याकडून तसे उमेदवारी चेहरे पुढे येत आहेत.

अशावेळी ठाकरे सलग तीन वेळचा मतदारसंघ ताब्यात ठेऊन पवारांना आपली पॉवर दाखवणार का? याची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकीला संबंधित ग्रामीण मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच शहरातील विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख या बैठकांना हजेरी लावतील. ( Maval Lok Sabha Constituency Shiv Sena Uddhav Thackeray Vs Ajit Pawar Sharad Pawar Nationalist Congress Party )

16 ऑगस्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर
17 ऑगस्ट – अहमदनगर, नाशिक, दिंडोरी आदी मतदासंघ
18 ऑगस्ट – मावळ, शिरूर, बारामती, पुणे
19 ऑगस्ट – सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले आदी
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
– अडीच हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत वडगावमध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण; हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता
– मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval

Next Post

सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
online-varas-nond

सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.