मागील अठ्ठावीस वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले असून शुक्रवारी (दिनांक 18 ऑगस्ट) न्यायालयात हजर राहण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. दिलबागसिंग ऊर्फ राजेंद्रसिंग (रा. पिंपरी, पुणे) आणि थॉमस ऊर्फ जॉनी चॉको कुरियन (रा. साकीनाका, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात 1995 मध्ये फिर्यादी दिली होती. वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल आहे. न्यायालयाने दोघांना फरारी घोषित केले असून 18 ऑगस्ट 2023 रोजी हजर होण्याचा आदेश दिला आहे. ( Vadgaon Maval Court issued arrest warrant against the two who had tipped off the police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
– दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड