गुरुवारी (दिनांक 17 ऑगस्ट 2023) रोजी पुणे जिल्हा आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विधानभवन इथे श्री क्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी मंदिर विकासाबाबत काही महत्वाचे निर्देश दिले. ( meeting was concluded regarding Shri kshetra Bhandara Hill Pilgrimage Development Plan )
आयुक्तांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे;
- श्री क्षेत्र भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करा. आपण सर्वजण मिळून अप्रतिम काम इथे करू.
- तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना व स्थानिक नागरिकांना दर्जेदार व पायाभूत सुविधा मिळाव्यात,याचे खात्री करा.
- मावळ /खेड कृषी व महसूल विभागाच्या ताब्यात असलेली गायरान जागे संदर्भात बैठक घ्यावी.
- परिक्रमा मार्गावर असणाऱ्या वनविभागाच्या जागे संदर्भात प्रस्ताव सादर करावा.
- मुख्य मंदिर,रस्ते,पाणी पुरवठा या पायाभूत सुविधांची पहिल्या टप्प्यात कामे सुरू करावी.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, विश्वस्त साहेबराव काशीद, गजानन शेलार, दिलीप ढोरे, मंदिर आर्किटेकट सोनपुरा आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
– दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक