व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यात नवीन 19 हजार 577 अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

राज्यात ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ अंतर्गत भरती प्रक्रियेद्वारे तब्बल 19 हजार 577 नवीन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 23, 2023
in महाराष्ट्र
Anganwadi-Sevika

Photo Courtesy : Tweet/ CMO Maharashtra


राज्यात ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ अंतर्गत भरती प्रक्रियेद्वारे तब्बल 19 हजार 577 नवीन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील 58 अंगणवाडी कर्मचारी यांना सह्याद्री अतिथीगृह इथे प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थितीत होते. ( 19577 new Anganwadi Sevika and helpers appointed in maharashtra )

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच त्यांनी नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बालकांना शिक्षण देणे व त्यांचे योग्य पोषण करून त्यांचा मानसिक विकास करणे यामध्ये मोलाची कामगिरी अंगणवाडी कर्मचारी बजावत असतात. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले असून विविध महिला विकासाच्या योजना शासन राबवत असून महिलांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

अंगणवाडी कर्मचारी हे फक्त पोषण आहार देणे व बालकांचे संगोपन करणे एवढेच काम करीत नसून सुदृढ बालक आणि सक्षम पिढी घडविण्याचे काम करीत असतात. राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व… pic.twitter.com/oEdQWij92p

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2023

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा व धीरज आहुजा, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील 58 नवनियुक्त अंगणवाडी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. यादव यांनी विभागाविषयी माहिती दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘संकल्प नशामुक्ती अभियान’ – मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या 8 नशेखोरांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala Crime
– ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आणि काही तासात नवीन शिक्षक रुजू झाले; शिळींब गावातील हटके आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा
– इनरव्हील क्लब आणि पवना मेडिकल फाऊंडेशन मार्फत ‘जीवन रक्षक अभियान’, नागरिकांना मिळाले जीव वाचवण्याचे धडे


Previous Post

लेट्स चेंज उपक्रम – मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा शुभारंभ, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Next Post

जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Maval

जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.