न्यु इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे मावळ तालुक्यातील अग्रगण्य अशा महिंद्रा एक्सलो या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व या निधीतून विद्यालयातील ६८९ विद्यार्थीनींसाठी सुमारे १० लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले. या लोकार्पण प्रसंगी कमर्शिअल महिंद्रा अक्सेलो कंपनीचे व्हा. प्रेसिडेंट दिवाकर श्रीवास्तव, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मनोज ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, निवास गांधाले, प्रशांत चाटप, अभिजित जाधव, नितीन वेदपाठक, जगदीश परब, सूर्यकांत महामुनी आदि मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि नगरसेवक प्रविण चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून आणि पाठपुराव्यातून हा प्रकल्प साकारण्यात आला. पाण्याचा किमान वापर, जास्तीत जास्त स्वच्छता आणि निरोगी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असे अद्यावत स्वच्छतागृह आहे. नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून आणि पाठपुराव्यातूनच नुकतेच सुमारे ३ लाख रुपये खर्चाच्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन हे देखील याच शाळेला महिंद्रा कंपनीच्या माध्यमातूनच बसवण्यात आली. ( modern restroom for female students at new english school vadgaon maval )
महिंद्रा एक्सलो कंपनीच्या इतर कर्मचारी वृंदांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश शाळेच्या नुकत्याच बदलण्यात आलेल्या गणवेशासाठी ११ गरजू विद्यार्थिनींसाठी आर्थिक मदत देखील देण्यात आली. या कायमस्वरूपी प्रकल्पाचे उद्घाटन महिंद्रा एक्सलो कंपनीचे व्हा. प्रेसिडेंट दिवाकर श्रीवास्तव यांनी केले आणि आपल्या मनोगतामध्ये स्वच्छतेचे, तसेच डिजिटल क्लासरूमचे महत्त्व सांगीतले. निवास गांधाले यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी महिन्द्रा एक्सेलो कंपनीने विद्यालयाला केलेल्या मदतीबदल आभार मानत यापुढे देखील शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
किसन रत्नपारखी व मनोज ढोरे यांनी महिंन्द्रा सारख्या कंपनीची अनेक सामाजिक उपक्रमांसाठी गरज आहे, त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे हे नमूद केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी कलादालनालाही भेट दिली. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका प्रज्ञा गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी आडकर यांनी केले, आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री लेंभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार फडतरे, गणेश शेंडगे, प्रविण ढवळे, राजेंद्र आडमुठे, अरविंद ढाकणे, शोभा ,सुर्यवंशी, जयश्री कदम, दिनेश मोरमारे यांनी विशेष सहकार्य केले. ( modern restroom for female students at new english school vadgaon maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राज्यपाल रमेश बैस यांचा लोणावळा दौरा, स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराचे केले वितरण, कैवल्यधाम योग संस्थेलाही दिली भेट
– तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट
– पोस्ट कार्यालय आले दारी…! पवन मावळातील किल्ले तुंग परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच स्वतंत्र पोस्ट कार्यालय