व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘इलेक्ट्रिकल टेक्निशियन यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, लवकरच निर्णय’

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे कार्यशाळेचे उद्घाटन - पुणे

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 2, 2023
in पुणे, शहर
mahavitaran

file image


“वीज तांत्रिक कार्मगार हा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणारा हा घटक आहे. अहोरात्र मेहनत घेऊन राज्यातील तीन कोटी ग्राहकांना सेवा देणाऱ्या या कामगारांना चांगली पगारवाढ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे वीज तांत्रिक कामगारांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विश्वास पाठक बोलत होते.

येरवडा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते. प्रसंगी महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महानिर्मितीचे संचालक एस. एम. मारुडकर, महापारेषणचे संचालक सुगत गमरे, महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, भारत पाटील, महानिर्मितीचे मुख्य अधिकारी पी. एल. वारजूरकर, संयोजक हाजी सय्यद जहिरोद्दीन, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सायकर व कार्यशाळा प्रमुख अपसरपाशा सय्यद आदी उपस्थित होते. राज्यभरातून ८०० पेक्षा अधिक वीज तांत्रिक कामगार कार्यशाळेत सहभागी झाले. ( inauguration of workshop by maharashtra state electricity technical workers association at pune )

विश्वास पाठक म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2018 मध्ये पाच वर्षांकरिता वीज तांत्रिक कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली होती. हे वर्ष पगारवाढीचे असून, आताचे सरकार शिंदे-फडणवीस यांचे असून, ऊर्जामंत्री फडणवीसच आहेत. त्यामुळे पगारवाढीचा निर्णय लवकरच होईल. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आता वीजदेखील मूलभूत गरज बनली आहे. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही संस्थांतील आपण सर्वजण वीज पुरवतो. आज राज्याला 28 हजार मेगावॅट वीजनिर्मितीची गरज असून, त्यातील 10 हजार मेगावॅट वीज आपण पुरवत आहोत. कामगार चळवळीची गरज आहेच; पण आपल्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.”

हाजी सय्यद जहिरोद्दीन म्हणाले, “कामगारांच्या सुरक्षेसाठी, हितासाठी तसेच संघटनेला सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. तांत्रिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चळवळ जिवंत ठेवणारी ही संघटना आहे. तिन्ही कंपन्यांशी संबंधित कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत. गाव तिथे वीज आणि वीज तिथे तांत्रिक कामगार आहे. त्यामुळे 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी कामगारांना चांगली पगारवाढ मिळायला हवी.”

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! पवना नदीकाठच्या नागरिकांना महत्वाची सुचना, लगेच वाचा
– मुक्काम पोस्ट माळेगांव खुर्द!! अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आदिवासी बहुल भागात नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन
– मोठी बातमी! पवनानगर भागातील प्रसिद्ध कृषी व्यवसायिकाच्या घरी 14 लाखांची घरफोडी, परिसरात खळबळ


dainik maval jahirat

Previous Post

रांजणगाव इथे उभे राहणार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, केंद्राकडून 62.39 कोटींचा निधी राज्य सरकारकडे वर्ग

Next Post

‘आपलं मत आजच ठरवा, भाजप-आरएसएसची सत्ता उलथवून टाका’, वाचा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
prakash-ambedkar-speech

'आपलं मत आजच ठरवा, भाजप-आरएसएसची सत्ता उलथवून टाका', वाचा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.