राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला तालुक्यातील सर्वच स्तरातून विरोध होत आहे. भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष तथा भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी देखील व्हिडिओद्वारे निवेदन देऊन आपली आणि पक्षाची भुमिका स्पष्ट केली आहे. ( moratorium on Pavana Canal Project lifted Maval BJP Ravindra Bhegde opposes government decision )
काय म्हणाले रविंद्र भेगडे?
“माझ्या मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला सुरवातीपासून आमचा विरोध होता आणि आजही कायम राहील,” अशी ठाम भुमिका रविंद्र भेगडे यांनी घेतली आहे
तसेच, “पिंपरी चिंचवड शहरवासीयांना पाणी देण्यास आमचा विरोध नसून ते पाणी बंद पाईपलाईन द्वारे नेण्यास विरोध आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने शासनाला विनंती करतो की, बंद पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्पास आपण कायमस्वरूपी स्थगिती देऊन मावळातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.
“मावळ तालुका भारतीय जनता पार्टी आणि सहकारी पार्टी सर्व पक्षांचा ह्या पुर्ण विरोध आहे. कालही आमचा त्याला विरोध होता. परंतू पाणी द्यायला आमचा विरोध नव्हता. परंतू बंद पाईपलाईनच्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहिल. माझी शासनाला विनंती आहे की हा प्रकल्प कायमचा रद्द करावा आणि मावळ तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा प्रकारची विनंती करतो.” – रविंद्र भेगडे
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली! सरकारने हा निर्णय का घेतला? पत्रात नेमकं काय लिहिलंय? वाचा सविस्तर
– Breaking! शिंदे सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली; मावळातील नेत्यांचे अपयशी प्रयत्न