व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात आता 24 तास असणार उजेड; रात्रीच्या अंधारातही गावकऱ्यांच्या पायवाटा उजाळणार

मावळ तालुक्यातील तुंग हे गाव आता वीज गेली किंवा अंधार पडला तरीही चोवीस तास प्रकाशित राहणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 29, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Tung-Village-Maval

Photo Courtesy : Sarika Shinde


मावळ तालुक्यातील तुंग हे गाव आता वीज गेली किंवा अंधार पडला तरीही चोवीस तास प्रकाशित राहणार आहे. ह्याचे कारण ह्या गावात सौर उर्जेवर चालणारे पथदिवे जागोजागी बसवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दिनांक 25 सप्टेंबर 2023) रोजी हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था आणि युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत मावळमधील दुर्गम भागात असलेल्या ग्रामपंचायत तुंग इथे 25 सौरपथदिवे बसवण्यात आले.

पवन मावळ भागातील किल्ले तुंग च्या पायथ्याशी असलेले तुंग हे गाव दुर्गम भागातील गाव म्हणून ओळखले जाते. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गाव परिसरात जंगली श्वापदे, साप, विंचू आदींचा वावर असतो. अशात रात्रीच्यावेळी अंधारात घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोकदायक आणि जीवावर बेतणार असते. त्यामुळे गावकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन गावात सौरदिव्यांची सोय करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

हॅन्ड इन हॅन्ड आणि युनिव्हर्सल शॅम्पो यांसह ग्रामपंचायत तुंग यांच्या माध्यमातून गावात 25 ठिकाणी बसवण्यात आलेल्या सौर दिव्यांमुळे गावात वीज गेली किंवा अंधार पडला तरीही सौर दिव्यांमुळे पायवाटा उजाळणार आहेत. नागरिकांना यामुळे सुरक्षितपणे बिनदिक्कत घराबाहेर पडता येणार आहे. हे पथदिवे बसवण्यासाठी ग्रामपंचायतीचे आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रमामुळे शाश्वत उर्जा उपायांच्या दिशेने गावाने एक पाऊलही टाकले आहे. ( 25 solar street lights have been installed in Tung village of Maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र
– तळेगावच्या प्रथमेशने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती; सहकाऱ्यांसोबत थाटामाटात साजरा केला गणेशोत्सव
– महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला गालबोट! ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक गणेशभक्तांचा मृत्यू, जखमींची संख्याही अधिक


Previous Post

वडगावात घरगुती गणपती सजावट स्पर्धेला भरघोस प्रतिसाद; गणेश भक्तांनी जिंकली 90 हजार रुपयांची रोख बक्षिसे, बघा यादी

Next Post

लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavla-rape-case

लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : कर वसुलीसाठी तळेगाव नगरपरिषदेची विशेष मोहीम ; मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शासनाची ‘अभय योजना’

February 13, 2026
As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

February 13, 2026
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

February 13, 2026
Lions Point near Lonavala becoming suicide point body of youth was found in 250 feet deep gorge

लोणावळा जवळील जगप्रसिद्ध लायन्स पॉइंट ठरतोय आत्महत्येचा पॉइंट ? 250 फूट खोल दरीत आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह

February 13, 2026
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.