पवनानगर : येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुदामराव नागू घारे (वय 59) यांचे आज मंगळवार, दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 3 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. घारे यांनी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पद भूषवले होते. तर येलघोल गावचे ते माजी सरपंच होते. येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच जयवंत घारे यांचे ते वडील आणि उद्योजक विनायक राजिवडे यांचे सासरे होत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुदामराव घारे यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे निष्टावंत कार्यकर्त्यांपैकी एक होते. तसेच येलघोल धनगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी अनेक विधायक कामे केली होते. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. ( Former Vice President of Maval BJP Sudamrao Ghare passed away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
– स्पर्धा परीक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर नियुक्त झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार
– चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला जाधववाडी धरण परिसराच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन