महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच सोपान सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतू राजीनामा सुनावणीच्या वेळी तो राजीनामा दिला नसल्याचे सांगण्यात आले आणि सरपंच पदाचा वाद न्यायालयात गेला. ( Gorakh Dongre Elected Sarpanch of Mahagaon Group Gram Panchayat Maval )
यामध्ये ग्रामपंचायतीचे आठ महिने गेले. या कार्यकाळात उपसरपंच बहिरट यांनी प्रभारी सरपंच म्हणून काम पाहिले. अखेर सरपंचपदाच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी गोरख डोंगरे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी गोरख डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी सदस्य संतोष घारे, स्वाती बहिरट, राणी साबळे, योगिता सावंत, उर्मिला पडवळ, यमुना मरगळे यांच्या सह आदी जण उपस्थितीत होते. निवडणूक अधिकारी म्हणून काले मंडलाधिकारी सचिन कोकाटे तलाठी सूर्यकांत राऊत, ग्रामसेवक एल. एस. साळवे यांनी पाहिले. निवडीनंतर ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
‘आगामी काळात सर्वांच्या विश्वासात घेऊन गावातील ज्येष्ठांचा अनुभवातून जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.’ – गोरख डोंगरे
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप । Vadgaon Maval
– पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात वडगाव शहर भाजपाचा सक्रीय सहभाग; 7 टन कचरा संकलित
– मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; वाचा 29 ग्रामपंचायतींची यादी