स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 67 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2023-24 चे आयोजन मध्यप्रदेश येथील विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद इथे दिनांक 3 ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघात राज्यस्तरीय स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील 46 किलो वजनी गटात प्रथम पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी कु. क्षितिजा जगदिश मरागजे हिची निवड झाली होती. या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर क्षितिजा हिने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्याचे नावलौकिकात भर टाकली आहे.
राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकानंतर क्षितिजाने राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक पटकविल्याबद्दल आमदार महेंद्र थोरवे, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, खोपोलीचे पोलिस निरिक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलिस निरिक्षक हरिश काळसेकर, कारमेल कॉन्व्हेंट मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या सह अनेक मान्यवरांनी क्षितिजाचे कौतूक करून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
क्षितिजा ही खोपोली शहरातील (जि. रायगड) येथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी असून ती कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पालांडे, विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तसेच तिला क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, जयश्री नेमाने, समीर शिंदे यांचे ही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ( wrestler Kshitiya Maragje from raigad district won bronze medal in national wrestling tournament )
View this post on Instagram
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– धक्कादायक! सुनेकडून सासूला बेदम मारहाण, महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद – Viral Video
– कान्हे सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणूकीत अनिल मोहिते बहुमताने विजयी
– जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा