व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी आणि कातकरी समाजातील कुटुंबांसाठी जातीचे दाखले काढून देणे या सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 19, 2023
in लोकल, शहर
Seva-Abhiyan-for-Tribals

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी आणि कातकरी समाजातील कुटुंबांसाठी जातीचे दाखले काढून देणे या सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव शहरातील अनेक ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. शैक्षणिक कामांसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते तसेच भूमिहीन होते, अशा कुटुंबातील नागरिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो व वेळोवेळी दाखला काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजातील बांधवांना “मदत नव्हे कर्तव्य” या सामाजिक बांधिलकीतून हे सेवाभावी अभियान राबविण्यात आले आहे.

वडगाव मधील या समाजातील जवळपास सुमारे दिडशे कुटुंबीयांचे जातीचे दाखले काढण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मा ता काॅंग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, मा. ता. राष्ट्रवादी वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, जेष्ठ नागरिक सेल तालुकाध्यक्ष विष्णू गुरूजी शिंदे, ऍड अशोक ढमाले, जेष्ठ नागरिक सेल वडगाव अध्यक्ष शांताराम कुडे, जेष्ठ नेते चंदुकाका ढोरे, अर्जुन ढोरे, बारकू ढोरे, श्रीधर ढोरे, सुरेश कुडे, किसनराव वहिले, लक्ष्मण ढोरे, बाळकृष्ण ढोरे, नितीन भाबंळ, चंद्रकांत राऊत, बबनराव कदम यांसह;

वडगाव राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अतुल वायकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, नगरसेविका पूनम जाधव, मा उपसरपंच विशाल वहिले, सचिन वामन, रुपेश सोनुने, युवा उद्योजक अमर चव्हाण, युवा नेते सचिन कडू, नितीन चव्हाण, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, पप्पू सावले आणि पत्रकार बांधव, मोरया प्रतिष्ठान चे सभासद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट आणि संचालिका तसेच वडगाव शहरातील आदिवासी, ठाकर व कातकरी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या दीड महिन्याच्या कालावधीत या समाजातील उपस्थित असलेल्या सर्व कुटुंबीयांना जात प्रमाणपत्र मोफत काढून दिले जाणार आहे. याशिवाय येत्या काळात वडगाव मध्ये ठाकर, आदिवासी व कातकरी समाजातील लहान मुलांसाठी हाॅस्टेल उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले. ( Seva Abhiyan for Tribals Morya Pratishthan Vadgaon Activity on occasion of MLA Sunil Shelke birthday )

अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार
– जनरल मोटर्सच्या कामगारांबाबत ‘वर्षा’वर बैठक संपन्न; मुख्यमंत्री शिंदेंचा कामगारांना शब्द, मंत्री सामंत गुरुवारी उपोषणस्थळी येणार


dainik maval jahirat

Previous Post

इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’

Next Post

बैलपोळा सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू; सावळा येथील शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bull-died

बैलपोळा सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू; सावळा येथील शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.