मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आजचा (दि. 30 ऑक्टो) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याने याप्रकरणी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी मराठा समाजाकडून वाढू लागली आहे. अशात मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला इथे अनेक युवकांनी तलावात जलसमाधी आंदोलन केले. त्यांना जलसमाधी आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, युवक आंदोलनावर ठाम राहिले. ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं’, ‘एकत मिशन, मराठा आरक्षण’ अशा घोषणा देत या युवकांनी त्यांचे आंदोलन सुरु ठेवले. यावेळी युवकांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज काठावर उपस्थित होता. ( Youth protest in Karla lake demanding Maratha reservation Maval Taluka )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा – 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval
– ‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम