व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आरक्षण आमच्या हक्काचं…’, टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्य भरातील गावांगावातून मराठा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 1, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Maratha-Reservation

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्य भरातील गावांगावातून मराठा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांत साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर, अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत. मावळ तालुक्यातही साधारण 40 गावांत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. टाकवे बुद्रुक गावात मराठा आंदोलकांनी मंगळवारी, दि. 31 ऑक्टो. गावात मशाल मोर्चा काढला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ टाकवे बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी “एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मनोज जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत टाकवे गावातील हाजारोंच्या संख्येने मराठा बांधव मशाल मोर्चात सामील झाले होते. म्हाळसाकांत चौक, हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बुद्ध नगर, बस स्टॉप आणि शेवट म्हाळसाकांत चौक जिथे साखळी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी शिववंदना घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.

तसेच, ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तसा निर्णय होत नाही, तो पर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये, जर कुणीही आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला तर त्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहील,’ असा निर्णय टाकवे बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तसेच, गावांत साखळी उपोषण सुरू केले आहे ते पुढेही सुरू राहील, असे निवेदन मावळ तहसील कार्यालय व वडगाव पोलिस ठाण्याला दिले आहे. ( Maratha Reservation Torch march by Sakal Maratha community in Takve Budruk Maval Taluka )

अधिक वाचा –
– Breaking! मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे
– मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime
– ‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद! मावळ कन्येचा ‘झिरो ते हिरो’ पुरस्काराने मुंबईत सन्मान

Next Post

मोठी बातमी! मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात, मराठा आरक्षणासाठी करत होते आंदोलन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

मोठी बातमी! मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात, मराठा आरक्षणासाठी करत होते आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.