आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) गुरुवारी (दि. 2 नोव्हेंबर) पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 दरम्यान द्रुतगती मार्ग बंद राहील. पुण्याकडे जाणारी वाहतूक यामुळे काहीकाळ बंद ठेवली जाईल. सोमाटणे फाट्याजवळ ही गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने ब्लॉक घेतले जात आहेत. हे काम आणखी काही महिने चालणार असल्याने आणखी काही दिवस अशाच ब्लॉकचा सामना प्रवाशांना करावा लागणार आहे. ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी केले आहे.
गुरुवारी घेतला जाणारा ब्लॉक दरम्यान, मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) वाहिनीवर कि.मी. 54.400 वरून एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविण्यात येईल. मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेनने उर्से खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्ग या रस्त्याने पुढे पुण्याच्या दिशेला जातील. ( block for installation of grantee near Urse Toll Plaza on mumbai pune expressway )
अधिक वाचा –
– ‘आरक्षण आमच्या हक्काचं…’, टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा
– कौतुकास्पद! मावळ कन्येचा ‘झिरो ते हिरो’ पुरस्काराने मुंबईत सन्मान
– मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू