व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात

जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2023
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 19 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. तसेच, या प्रकरणामध्ये विजय चंद्रकांत चव्हाण (वय 53, रा. सातारा) आणि सचिन निवास धोत्रे (वय 31 रा. सांगली) अशा दोघांना अटक केली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता 4 नोव्हेंबरपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बेंगळुरू-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रावेत गावच्या हद्दीतील एका उपाहारगृहासमोर सापळा रचला. त्यानुसार, पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेंझ कंपनीचे 14 चाकी वाहन अडवून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनात 50 किलो वजनाचे जनावराचे खाद्य भरलेली 80 पोती होती. तर, या पोत्यांच्या खाली गोवा राज्यात निर्मिलेली आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसासाठी आलेले विदेशी मद्याची खोकी आढळून आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कारवाईत 750 मिली क्षमतेच्या प्रत्येक खोक्यामध्ये 12 बाटल्या या प्रमाणे 431 खोकी (5172 बाटल्या), 180 मिली क्षमतेच्या प्रत्येक खोक्यामध्ये 48 बाटल्या याप्रमाणे 785 खोकी (37680 बाटल्या) तसेच 500 मिली क्षमतेच्या किंगफिशर बिअरची 40 खोकी (960 बाटल्या) असा एकूण 74 लाख 56 हजार 200 रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. पथकाने रॉयल ब्ल्यू व्हिस्की, आईस मॅजिक ऑरेंज वोडका आणि रॉयल ब्लंक माल्ट व्हिस्कीच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. मद्य तसेच वाहन असा एकूण 1 कोटी 19 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( Big action Two foreign liquor smugglers arrested goods worth Rs 1 crore seized )

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन गुरुवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, नाहीतर अडकाल…
– वडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण ठाकर । Maval News
– मोठी बातमी! मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात, मराठा आरक्षणासाठी करत होते आंदोलन


Previous Post

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

‘वेळ घ्या, पण आरक्षण द्या’, मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Reservation

'वेळ घ्या, पण आरक्षण द्या', मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.