मराठा आरक्षणाचे प्रमुख आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. या निर्णयासह जरांगे यांनी आपले दुसऱ्या टप्प्यातील उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज (दि. 2 नोव्हेंबर) आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तिथे प्रदीर्घ चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जरांगे पाटील यांनी, ‘आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या,’ असे म्हटले. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन देखील जरांगे यांनी मराठा बांधवांना केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेले होते. यावेळी शिष्टमंडळात निवृत्त न्या. मारोती गायकवाड आणि न्या. सुनील शुक्रे, वकील हिमांशू सचदेव तसेच इतर कायदेतज्ञ, मंत्री संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, बच्चू कडू, नारायण कुचे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मराठा आरक्षणा प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचेही आश्वासन दिले. जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर पाटलांनी त्यांचे उपोषण सोडले.
सुरुवातीला जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली होती. परंतू शिष्टमंडळाने वेळ वाढवून मागितली. तेव्हा जरांगे यांनी सरकारला एकही दिवस वाढवून देण्यास विरोध केला. परंतू सरकारच्या शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती केली. जरांगे पाटील मात्र 24 डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. अखेर तारखांबाबत बराच वेळ चर्चा करण्यात आली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे म्हटले.
तसेच 2 जानेवारीनंतर मुंबईचे नाक बंद करु, असा इशारा त्यांनी बोलताना दिला. सरकारच्या शिष्टमंडळाला मिळालेलं हे मोठं यश म्हणावे लागेल. कारण दिनांक 25 ऑक्टोबरपासून सुरु असलेले जरांगे पाटलांचं उपोषण अखेर त्यांनी सोडवले आहे. ( Maratha Reservation Movement Manoj Jarange Patil called off his fast Breaking News )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचा बोनस भेट
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन गुरुवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, नाहीतर अडकाल…
– वडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण ठाकर । Maval News