पवन मावळ भागातील मौजे शिळींब गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बाबूराव धनवे, यांचे शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजार आणि वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मावळ तालुका कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती नंदकुमार धनवे यांचे ते चुलते होते. तर, मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते आबुराव धनवे यांचे ते बंधू होते. वयाच्या 86 व्या वर्षी शंकरराव धनवे यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्यावर आज, शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) शिळींब गावातील वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय जमला होता. राजकीय, सामाजिक आणि संप्रदाय क्षेत्रात कार्य केलेले शंकरराव धनवे यांच्याबद्दल बोलताना अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शंकर धनवे यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आता त्यांचे बंधू आबुराव धनवे, मुली, जावई, मुलगा सुरेश धनवे, सुन, पुतणे नंदकुमार धनवे आणि अन्य पुतणे, नातू शिळींब ग्रामपंचायतीचे सदस्य विजय धनवे, अन्य नातवंडे असा परिवार आहे. येत्या 22 तारखेला माळेचा विधी राहत्या घरी होईल, अशी माहिती धनवे कुटुंबीयांनी दिली. ( Shilimb Village Shankar Dhanve passed away at Age 86 )
अधिक वाचा –
– करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड
– कामाची बातमी! पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय