बंगळुरु येथील सेवानिवृत्त एअरफोर्स ऑफिसर मुरली टी. व्ही. हे माळेगांव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. मुरली टी. व्ही. सर यांचे हे त्यांचे 20 वे मिशन असून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 62 हजार मदत गोळा करून धनादेशाद्वारे ती रक्कम शाळेकडे सुपुर्त केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुरली सर स्वतः एक उत्तम लेखक असून त्यांनी त्यांची प्रकाशित केलेली पुस्तके शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यावेळी अनेक प्रश्न विचारले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र कॉर्डिनेटर चमेली करमाकर मॅडम यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिवाजी भोर व सर्व सहकारी शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.
सेवाधाम संस्थेचे विश्वस्त डॉ. कृष्णकांत वाढोकर, इतर सर्व विश्वस्त तसेच सेवाधाम हॉस्पिटलचे अकौंटंट बाळासाहेब घोजगे, सर्व माळेगांव ग्रामस्थ आणि पालक यांनी मुरली सरांचे कौतुक केले. सुत्रसंचालन उज्वला भोर यांनी व आभार आश्रमशाळेची विद्यार्थीनी मोहिनी कारभळ हिने मानले. ( 62 thousand financial assistance to tribal students of ashram school of malegaon khurd maval )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती
– दिवाळीचा पहिला दिवा… शेकडो पणत्यांनी उजळला किल्ले लोहगड, डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो – पाहा
– करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड