दिवाळीनिमित्त तळेगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांना 25 हजारांचा बोनस मिळाल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड झाली. दिवाळीनिमित्त 25 हजार सानुग्रह अनुदानाला प्रशासक सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळूनही तळेगाव नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. त्यामुळे कर्मचारी संघटनेने मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना गुरुवारी (दि. 9 नोव्हेंबर) निवेदन देऊन काम बंद आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.
अखेर आमदार सुनिल शेळके यांच्या मध्यस्थीमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) अनुदानाच्या धनादेशावर सही करण्यात आली. अपेक्षेनुसार अनुदान मिळाल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर ‘गोड’ झाली. कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याकामी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विजय शहाणे, मल्लिकार्जुन बनसोडे तसेच मनीषा चव्हाण आणि अध्यक्ष रवींद्र काळोखे यांनी विशेष पाठपुरावा केला. संघटनेचे उपाध्यक्ष मुरलीधर टकले, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, रोहित भोसले, प्रशांत गायकवाड भास्कर वाघमारे आणि प्रवीण माने यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले. ( diwali bonus approved for talegaon dabhade municipal council employees
)
अधिक वाचा –
– अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा – आमदार सुनिल शेळके
– शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय
– मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती