मावळ तालुक्यातील परंदवडी येथील गरीब आदिवासी आणि कष्टकरी बांधव यांच्याबरोबर रयत विद्यार्थी विचार मंच संस्था यांच्यावतीने दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी लहान मुले, महिला, पुरुष यांना फराळ संचाचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, राज्य समन्वयक श्वेता ओव्हाळ, राज्य सचिव प्रगती कोपरे, मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे, मावळ तालुका महासचिव तथा प्रदेश प्रवक्ता विक्रांत शेळके, तळेगाव शहर प्रमुख प्रणाली कावरे, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख अभिषेक चक्रनारायण, प्रभारी शहराध्यक्ष योगेश कांबळे, सदस्य सिद्धार्थ सूर्यवंशी, सदस्य माधवी खरात उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
( diwali celebration with tribal families in parndavadi maval by Ryat Vidyarthi Vichar Manch Sanstha )
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘एक दिवा वंचितांसाठी’ अभियान; अहिरवडे येथील आदिवासी वस्तीवर फराळ वाटप करुन दिवाळी साजरी
– वंचित बहुजन युवा आघाडीची मावळ तालुका आणि लोणावळा शहर नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – खासदार श्रीरंग बारणे