व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप

उर्से गावात (ता. मावळ) दिवाळी निमित्त भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Fort Build Competition For Childrens at Urse Village Maval Cash Prizes To Participants.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 18, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Fort-Build-Competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


उर्से गावात (ता. मावळ) दिवाळी निमित्त भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी यासासाठी अविनाश गायकवाड, धनंजय धामणकर, नवनाथ टेंभेकर, गणेश धामणकर, तुषार राऊत आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) या स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्पर्धेत गावातील लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. यात एकूण 25 स्पर्धकांची नोंद झाली होती. मुलांनी अत्यंत सुबक आणि आकर्षक किल्ले साकारले होते. या 25 किल्ल्यांची परिक्षकांमार्फत 13 तारखेला पाहणी करण्यात आली. यावेळी तुषार राऊत यांच्या मार्फत 13 तारखेला प्रत्यक्ष किल्ले पाहणीवेळी प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर या 25 स्पर्धकांमधून एकूण 6 मुलांनी बनवलेले आकर्षक किल्ले बक्षिसास पात्र ठरले. त्यात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे तिन्ही क्रमांक प्रत्येकी 2-2 स्पर्धकांत विभागून देण्यात आले.

अविनाश गायकवाड यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षिस रुपये 5000, धनंजय धामणकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे बक्षिस रुपये 3000 आणि नवनाथ टेंभेकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे बक्षिस रुपये 2000 अशी रक्कम आणि प्रत्येक विजेत्याला आकर्षक ट्रॉफी अशी बक्षिसे वाटप करण्यात आली. पर्यावरण पुरक किल्ला, माहिती देणारे फलक, हुबेहुब प्रतिकृती साकारणे अशा कसोट्यांवर हि स्पर्धा पार पडली.

बक्षिस वितरणावेळी अविनाश गायकवाड, धनंजय धामणकर, नवनाथ टेंभेकर, गणेश धामणकर, तुषार राऊत, वैभव धामणकर, देविदास धामणकर, कालिदास दातखिळे आदी आयोजन मान्यवर आणि उर्से गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Fort Build Competition For Childrens at Urse Village Maval Cash Prizes To Participants )

अधिक वाचा –
– शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन : सोमाटणे फाटा इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रुग्णांना फळे वाटप
– ‘महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा’, राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम

Next Post

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा योजनेतील अग्रीम भरपाईचे वाटप सुरु, आतापर्यंत ‘इतके’ कोटी वाटले, पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
peek-vima-yojana

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा योजनेतील अग्रीम भरपाईचे वाटप सुरु, आतापर्यंत 'इतके' कोटी वाटले, पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.