व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती

राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फुट पडल्याने पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 2, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Sharad-Pawar-Group

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फुट पडल्याने पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. अशात राज्यातील कार्यकर्ते देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन गटात विभागल्याचे दिसत आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. स्वतः आमदार सुनिल शेळके हे अजित पवार यांच्या सोबत असल्याने मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यात शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व दिसून येत नव्हते. मात्र आता शरद पवार गटाकडून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात संघटन बांधणी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल वसंतराव वहिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या हस्ते आणि युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षपदी विशाल वहिले आणि तालुका उपाध्यक्षपदी आदिनाथ मालपोटे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. ( Sharad Pawar Group Vishal Wahile appointed as Maval Taluka NCP Youth Congress President )

‘येणाऱ्या काळात पक्षाचा जास्तीत जास्त प्रचार करत, युवा संघटन करून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेसाठी कार्य करणार. मावळ तालुक्यात संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणारा असून, ज्येष्ठ नेते मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम करणार आहे.’ – विशाल वहिले

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ बापु शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, उद्योजक राजेश बाफना, मावळ तालुका अल्पसंख्याक सेल चे मा. अध्यक्ष अफताब सय्यद, युवा नेते सोमनाथ धोंगडे, विजय शिंदे ,अमोल जांभुळकर, सौरभ सावले, अशिष वहिले, पंकज भामरे, अभिजीत ढोरे, लौकिक सासवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनोद टकले, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती; ‘योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
– खासदार बारणेंनी घेतला लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार

Next Post

सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली! लायन्स मेट्रोपॉलीसकडून 24 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप । Pavananagar

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
distribution-of-bicycles

सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली! लायन्स मेट्रोपॉलीसकडून 24 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप । Pavananagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.