व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे

वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे ध्वजारोहण ग्रुप ग्रामपंचायत कान्हेचे उपसरपंच श्री बाबाजी शंकर चोपडे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 14, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Chhatrapati-Shivaji-Vidyamandir-kanhe

Photo Courtesy : Team Dainik Maval


विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा, असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी कान्हे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यक्त केले. भविष्यात शाळेला भौतिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे ध्वजारोहण ग्रुप ग्रामपंचायत कान्हेचे उपसरपंच श्री बाबाजी शंकर चोपडे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कारगिल योद्धा मेजर रामदास मदने व अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले. माजी आदर्श सरपंच किसन दगडू सातकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने मदत केली. यावेळी माजी उपसरपंच तसेच जि.प. प्रा. शाळा कान्हे शालेय समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांच्या सहकार्याने शालेय नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिबिंब या हस्तलिखिताचे प्रकाशन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ( Annual Reunion of Chhatrapati Shivaji Vidyamandir and Junior College Kanhe in presence of Bala Bhegde )

तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलादालन, विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कान्हेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विजयराव सातकर सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, रोटरी क्लब ऑफ निगडी च्या फर्स्ट लेडी कमलजीत कौर, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ निगडी हरबिंदरसिंग दुल्लत, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे उध्दव चितळे,स्पेशल सर्विस डायरेक्टर गुरुदीप सिंग भोगल, दादासाहेब सावंत,सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे , महेशभाई शहा उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरच स्पर्धा परिक्षेची माहिती व्हावी यासाठी स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था पातळीवर विविध उपक्रम तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अध्यापिका श्रध्दा मोहोळ आणि कविता येवले मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन प्रमुख रियाज तांबोळी, किरण गवारे , शिक्षक प्रतिनिधी राम कदमबांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी
– हिवाळी अधिवेशनातून मावळ तालुक्याला मिळणार मोठी गुड न्यूज! मावळवासियांची उत्कंठा शिगेला, कोणती घोषणा होणार?
– ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा । Actor Ravindra Berde Passed Away


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक! खोपोली पोलिसांकडून 218 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 174.5 किलो अं’मली पदार्थ जप्त

Next Post

ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Plus-Valley-Tamhini-Ghat

ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.