मावळच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटी निधी आणल्याबद्दल समस्त लोणावळाकर नागरिकांच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांचा शनिवारी (दि. 16 डिसेंबर) जंगी सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे भविष्यातील माझ्या विकासाच्या नव संकल्पनांना प्रोत्साहन मिळाले आहे. आपण सर्वांनी केलेला सन्मान हा नक्कीच मला प्रेरणा देणारा, तालुक्याचा विकास करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहराच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. पुढील काळात छत्रपती शिवाजी स्मारक, राजमाची रोप वे इ.जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील, हा विश्वास तुम्हा सर्वांना या निमित्ताने देतो. असे शेळके म्हणाले. ( mla sunil shelke was felicitated by citizens for getting 333 crore funds for glass skywalk project )
अधिक वाचा –
– ‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन
– दैनिक मावळ ‘संवाद’ : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका अंजली कुलकर्णी यांच्यासोबत खास बातचीत
– शेजाऱ्याने बांध कोरलाय? शेतजमीनीची शासकीय पद्धतीने मोजणी करायचीये? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, शुल्क आणि कागदपत्रे