व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवं संकट! कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

देशात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवार, दि. 21 डिसेंबर) आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 21, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
corona-jn1-variant

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवार, दि. 21 डिसेंबर) आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, विद्युत आणि अग्निशमन यंत्रणांचे ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् आदी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश देतानाच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

tata cars weekends ads

ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ( new corona jn1 variant maharashtra cm eknath shinde taken review meet )

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण, वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घेणे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारित करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीचीही माहिती घेतली. या बैठकीस आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

tata tiago ads may 2025

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी ते जून २०२४ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश


dainik maval ads may 2025

Previous Post

स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट

Next Post

महत्वाची बातमी! ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर’ दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne-nitin-gadkari

महत्वाची बातमी! 'तळेगाव-चाकण-शिक्रापूर' दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.