व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शौर्य दिन, 1 जानेवारी : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

पेरणे फाटा इथे 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 24, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Vijaystambha- Bhima-Koregaon

File Image


पेरणे फाटा इथे 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, पीएमपीएलचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, विविध यंत्रणांचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ( Shaurya Day 1 January Pune Administration ready for Vijaystambha greeting ceremony )

डॉ. देशमुख म्हणाले, दरवर्षी साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा आणि भावनीक कार्यक्रम आहे. यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून शासनातर्फे समिती गठीत केली आहे. 210 एकरात 33 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था, पीएमपीएल बसेससाठी 4 ठिकाणी थांब्याची सोय, राखीव वाहनतळ, वीज, आकर्षक रोषणाई, बुक स्टॉल, शुद्ध पाण्याची व्यवस्थेसाठी 150 टँकर्स, फिरते शौचालय, आरोग्य सेवेसाठी 15 पथके, 259 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, 50 रुग्णवाहिका, 27 जनरेटर सेट, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकासोबत स्वयंसेवक बोटी इत्यादी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 4 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी 475 पीएमपीएल बसेस तर 1 जानेवारी 2024 रोजी 575 पीएमपीएल बसेसचे नियोजन केले आहे. प्रत्येक बसवर दोन कर्मचारी, राखीव चालक, यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे पोलीस विभागाकडून पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. वाहतूकीतील बदलांविषयी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येईल.

सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Novel NIBR Ads

सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

अधिक वाचा –
– ‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना
– भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती
– तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती


dainik maval jahirat

Previous Post

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!

Next Post

मोठी बातमी! काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sunil-Kedar

मोठी बातमी! काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.