पवनानगर : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पवनानगर येथील एका खाजगी घरामध्ये आणि पोल्ट्री फॉर्ममधे अशा दोन ठिकाणी पत्यांचा जुगार अड्डा चालु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी सोमवारी (दिनांक 25 डिसेंबर) रोजी त्यांच्या कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पवनानगर इथे 1) दुर्गा माता मंदिराचे शेजारी एका बंद पत्र्याचे शेडमध्ये आणि 2) एम्पायर हॉटेलचे पाठीमागे, काले गावच्या हद्दीमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये अशा दोन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात एकूण 15 व्यक्ती हे जुगार खेळताना मिळून आले.
सदरच्या कारवाईत रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल असा एकूण रू 7 लाख 5 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सागर बनसोडे, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा/सचिन गायकवाड, पोकॉ रईस मुलानी, सिद्धेश वाघमारे व लोणावळा ग्रामीण स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे. ( Action by Lonavla Police IPS Satyasai Karthik team on gambling dens in Pavananagar area )
अधिक वाचा –
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!
– शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’
– मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन