मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मातोश्री इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी संजय राऊत, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि मावळ लोकसभेतील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघ हा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी कळीचा मुद्दा ठरणार, असे दिसत आहे. याचे कारण शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजपा हे सर्वच पक्ष मावळ मतदारसंघावर आपला दावा सांगत आहेत.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी मावळ लोकसभेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भुमिका स्पष्ट केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’
“मावळ लोकसभेची सीट हा आमचा अधिकार आहे. काहीही झालं तरीही कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही ही सीट निवडून आणू, असा विश्वास आम्ही उद्धव ठाकरे यांना दिला आहे. या मतदारसंघात पक्षाची स्थिती भक्कम आहे. आमच्या पक्षात आणि पक्षाच्या बाहेरूनही पक्षाच्या बाजूने लढण्यासाठी अनेक मात्तबर इच्छुक उमेदवार आहे. या सर्वाच्या जोरावर आम्ही मावळ लोकसभेचा जागा लढवू आणि जिंकून आणू. येत्या 21 तारखेला आदित्य ठाकरेंचा मावळ लोकसभेत दौरा होणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंची सभाही मावळ मतदारसंघात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमवेत बैठक पार पडली. ज्यात ही जागा जिंकून आणण्यासाठी महत्त्वाची चर्चा झाली. तसेच उमेदवार कोण द्यायचा याबाबत लवकरच निर्णय होईल”, अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Shiv Sena Thackeray group will give candidate Sachin Ahir )
अधिक वाचा –
– मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा
– अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!