पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या अधिपत्याखाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यानुसार, बुधवार (दिनांक 26 डिसेंबर 2023) रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांचे विश्वासातील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती स्वत:च्या जवळ विनापरवाना पिस्तूल घेवून फिरत असून तो वरसोली येथील कचरा डेपोच्या परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांना मिळाले बातमीचा आशय आणि छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले. ( Man arrested with pistol and live cartridge by Lonavala Rural Police )
त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ त्यांच्या सोबत असणारे स्टाफसह भारत गॅस गोडावून वरसोली इथे रवाना झाले. तिथे बातमीतील वर्णनाचा एक व्यक्ती उभा असलेला दिसला. त्याला पोलीसांची चाहूल लागताच तो तिथून पळून जावू लागला, त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रितीने सदर व्यक्तीचा पाठलाग करुन त्याला काही क्षणात त्याब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत राऊंड असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा माल हस्तगत करुन जप्त केला आहे. सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक आणि किशोर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलीस हवालदार नितीन कदम, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक भुषण कदम, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस अंमलदार संजयदादा पंडीत, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार त्रषीकेश पंचरास यांनी सहभाग घेतला. तपासात सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी अभिनंदन केले आहे.
अधिक वाचा –
– हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई
– मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मावळचे माजी आमदार स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण!