व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुढील 5 वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी । Vadgaon Nagar Panchayat

पुढील पाच वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करावा, असे निवेदन वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 4, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुढील पाच वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करावा, असे निवेदन वडगाव शहर ( Vadgaon Maval ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, मावळ विधानसभा युवक अध्यक्ष विशाल वहिले, मावळ विधानसभा सहकार सेल अध्यक्ष सुधाकर वाघमारे, मा. ग्रा. पं. सदस्य बारकूनाना ढोरे, नितीन भांबळ, पंकज भामरे, राहील तांबोळी आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव नगरपंचायतीने नवीन पाच वर्षातील आर्थिक वर्ष 2023-24 करिता मालमत्ता करामध्ये काही अधिकचे कराची नोंद करून वडगाव नगरपंचायत हद्दीतील घरमालकांना कराच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये चुकीची मोजणी बांधकामासंबंधित लावलेले चुकीचे निष्कर्ष नवीन लावलेल्या करांमध्ये केलेली भरमसाठ वाढ याबाबत पाठविण्यात आलेल्या नोटिसा नंतर बऱ्याच जवळपास 600 हून अधिक घरमालकांनी यावर आक्षेप सादर केलेले आहेत.

5 डिसेंबर 2023 रोजीच्या केलेल्या प्रत्यक्ष सुनावणीमध्ये करा संबंधाने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रत्यक्ष झालेल्या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष पाहणी तपासणी केल्यानंतर आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे लेखी आदेश आक्षेपावर देण्यात आलेले आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्षात पाहणी केलेली दिसत नाही. आरोग्य कर, अग्निशमन कर, पथकर, शिक्षण कर अशा अनेक कर लागू केले आहेत यातील लावलेले काही वेगवेगळे कर या संदर्भात प्रत्यक्षात नागरिकांना सर्व सोयी देखील उपलब्ध नाहीत.

“वडगाव शहरातील घरमालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढत चाललेला असून त्याचप्रमाणे संभ्रम देखील आहे. वाढीव करा संबंधित नागरिकांमध्ये सर्वत्र चर्चा सुरू असल्याने सबब आपल्या असे निदर्शनास आणून देण्यात येते की, नवीन वाढीव अवास्तव करा संदर्भात पुनर्विचार करण्यात येऊन सुधारित करावा,” अशा आशयाचे निवेदन वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांना देण्यात आले.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pune News
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी । Savitribai Phule Jayanti
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई! ड्र’ग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक । Kamshet Crime


dainik maval jahirat

Previous Post

आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election

Next Post

मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Trupti

मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.