व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान, वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान, वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 4, 2024
in महाराष्ट्र
maharashtra-cabinet-decision

Photo Courtesy : x / cmo


  • १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे.

मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली असून मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांमधील १८९१ लिपिक-टंकलेखकांना याचा लाभ मिळेल. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

  • अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील.

विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील ६ जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. ( 5 rs per liter subsidy for milk by shinde govt maharashtra cabinet decision 2024 )

  • नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्याच्या ७५० कोटीस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर १४५ कि.मी. ने कमी होईल. या मार्गावर एकूण १४ रेल्वे स्थानके असतील.

रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ISDSI ही योजना २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरु करण्यात आली आहे.

दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येणार असून १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये ही योजना राबविण्यात येईल.

  • पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ मधील अटी शिथिल करण्यात आल्या असून याचा फायदा ४०० उद्योगांना होईल.

सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आता अविश्वास प्रस्तावाचा कालावधी वाढविण्यात आला असून २ वर्षाच्या आत असा प्रस्ताव आणता येणार नाही, अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात अविश्वासाचा प्रस्ताव ६ महिन्याच्या आत सादर केला जाणार नाही अशी तरतूद आहे.

अधिक वाचा –
– आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election
– पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद; तब्बल 36 हजार नागरिकांनी घेतला सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास

Next Post

“राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत”

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jitendra-Awhad-On-Shri-Ram

"राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.