पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन केले होते. या कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड यांनी आमदार शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सेवेसोबतच आदिवासी भगिनींना साडी वाटप करुन भाऊबीज साजरी केली. यावेळी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ( Shivlila Patil Kirtan By NCP Babaji Gaikwad at Takve Budruk on Ocasion of MLA Sunil Shelke Birthday )
“भक्तिपूर्ण कीर्तनासह समाज प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रात आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ या संतांच्या उक्तीनुसार अभंग, संतवाणी, कथा, वास्तवातील घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत चांगले विचार समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेक किर्तनकारांनी केला आहे. वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण मावळ तालुक्यात विविध ठिकाणी किर्तन सोहळ्यांचे आयोजन करून आपली सांप्रदायिक परंपरा जपण्याचे केलेले कार्य खरंच कौतुकास्पदच आहे”, असे यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले.
अधिक वाचा –
– जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार
– वडगाव मावळमध्ये 5 नोव्हेंबरपासून जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा I Weightlifting Competition