व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला

वडगांवचा स्तंभ हा मराठयांचा विजयस्तंभ आहे. यास आपण दर वर्षी 16 जानेवारीला वडगांव येथे येऊन मानवंदना दिली पाहिजे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 16, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Mahadji-Shinde-Statue

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पानिपतावरची लढाई 14 जानेवारी 1761 रोजी झाली. पानिपतात महाराष्ट्राच्या मातीतील अनेक मोहरे गमावले. लाखो बांगड्या फुटल्या होत्या. अनेक परागंदा झाले होते. कित्येक गुलाम करुन आफगाणीस्थानात नेले होते. किती नुकसान झाले याची गणतीच नव्हती. स्वराजावर झालेला मोठा आघात होता तो. त्यानंतर पेशवाईत सत्ता संघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षाचा फायदा घेऊन मराठी साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी प्रयत्न करीत होती. 

या काळात नारायणरावाची हत्या झाल्यावर रघुनाथराव (राघोबा) पेशवे झाले. आणी पेशवेपदासाठी ते आपल्याच राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने पुण्यावर चालून आले. पानिपतावर झालेली हानी आणी ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य यामुळे खिळखिळे झालेले मराठी साम्राज्य किती काळ तग धरेल, या आशेवर इंग्रज मराठी साम्राज्यावर युद्धासाठी मुंबईहून निघाले. तेव्हा मराठी सैन्याचे सेनापतीपद महादजी शिंदे यांच्याकडे होते. हे दत्ताजी शिंदेचे भाऊ होते, जे स्वत:ही पानिपतावरील लढाईत पाय गमाऊन परत स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले होते. ( Treaty of Vadgaon Battle between British and Marathas Vadgaon Maval January 16 1779 Mahadji Shinde Statue )

  • खुद्द रघुनाथराव इंग्रजांना मिळाले होते. सन 1779 पावसाळा संपल्यानंतर इंग्रजांनी मुंबईहून साधारण 4000 फौजेसह पुण्याकडे प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. खुद रघुनाथराव इंग्रजांना मिळाले होते. त्यामुळे इतरही सरदार त्याला येऊन मिळतील, या आशेवर मोठया उत्साहाने इंग्रज पुण्याकडे निघाले. जसा अफजलखानही विजापूरहून निघाला होता. त्यालाही मराठी गनिमी काव्याची माहिती नव्हती. त्याच युध्दा प्रमाणे काहीशी योजना महादजी शिंदेनी आखली.

शत्रुला आपल्या अनकुल भूमीवर आणायचे आणी त्याला अंदाज येण्याचा आत त्याचा समुळ पराभव करायचा हा डाव मराठी सैन्यानी आखला. इंग्रज खोपोली पार होई पर्यंत मराठी सैन्याने कोणतीच हालचाल केलेली दाखविली नाही. त्यामुळे आता पुणे हातात आलेच, हे गृहीत धरुन राघोबा आणी इंग्रज पुण्याचा दिशेने वेगात पुढे सरकु लागले. त्यांना पहिला झ्टका कार्ले इथे बसला. गनिमी काव्यात तरबेज मराठी फौजेने अजानक इंग्रज फौजेवर छापामार पध्दतीचा हल्ला केला. बेसावध इंग्रज फौजेचे मोठे नुकसान केले. त्याची रसद तोडली. साते, कान्हे, कामशेत भागात छापामार पध्दतीने मागून हल्ले करीत मराठे इंग्रजांना हैराण करीत होते. प्रत्यक्ष लढाईला सामोरे जावे लागेल यांचा अंदाज इंग्रजांना आला होता. इंग्रजांनी सैन्याची पूढील तयारी कराण्याचे ठिकाण तळेगांव निवडले.

इंग्रज काय रणनिती आखू शकतात याचा पूर्ण अभ्यास केलेले सेनापती महादजी शिंदे यांनी मराठी सैन्य व्यूहरचने अर्तंगत पूर्वीच वडगांव येथील एका टेकडी मागे लपवून ठेवले होते. मराठ्यांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (9 जानेवारी 1779), पण मराठयांनी तळेगाव सुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठे सुद्धा विषारी होते.

तळेगांव येथे पुढे गेलेले सैन्य पुन्हा वडगांव येथे आले तो पर्यंत टेकडी मागून जोरदार हल्ला केला. तो दिवस होता 13 जानेवारीला 1779. 14 च्या सकाळी इंग्रज सेनापती जेम्सस्टुअर्ट (ज्यास स्थानिक भाषेत फाकडा म्हणतात) महादजी शिंदेंच्या फौजे कडून वडगांव मावळ येथे मारला गेला. इंग्रजानी पराभवाचे पांढरे निशाण फडकविले पानीपतानंतर अवघ्या आठवर्षात मराठी साम्राज्य पुन्हा उभे राहिलेले या लढाईनंतर दिसले. अखेर 16 जानेवारी 1779 ला महादजी शिंदेनी इंग्रजांचा पराभव केला. त्यामुळे या 16 जानेवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी जो तह झाला, या तहास ‘वडगावचा तह’ असे म्हंटले जाते.

समोरा समोरील लढाईत मराठी फौजेने इंग्रंजाचा पराभव केला होता. त्यामुळे वडगांवची लढाई महत्वाची मानली जाते. इस्टुर फाकडाची कबर आजही वडगांव येथे पहावयास मिळते. त्याचा दरवर्षी 25 डिसेंबरला मोठा उत्सव होत होता, तो इतिहास प्रेमीनी बंद पाडला. या विषयी जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यातून एक स्वयंसेवकाची फळी उभी केली आहे. या विजयाची आठवण म्हणून ज्या ठिकाणी लढाई झाली. त्या ठिकाणी सेनापती महादजी शिंदे यांचा पुतळा आणी विजयस्तंभ आलीकडच्या काळात उभा केला आहे. इंग्रज- मराठा युद्धाच्या वेळी ब्रिटिशांच्या आत्मसमर्पणांचे वर्णन करणारे भित्तिचित्र. म्यूरल हे या स्मारकाचे वैशिष्टआहे.

आपल्या इतिहासाची माहिती व ज्ञान पिढयांन पिढ्या जतन करण्यासाठी महादजी शिंदे यांच्या नावाने भव्य ग्रंथालय पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने उभारण्यात येत आहे. 14 जानेवारी 1761 च्या पानिपताच्या हानी नंतर 16 जानेवारी 1779 मध्ये मराठी सैन्याने इंग्रजांचा समोरा समोरील लढाईत केलेला दारुण पराभव दत्ताजी शिंदे यांच्या पानिपतावरील घोषणेची सत्यता जागा पुढे खरी करुन दाखविली आहे. वडगांवचा स्तंभ हा मराठयांचा विजयस्तंभ आहे. यास आपण दर वर्षी 16 जानेवारीला वडगांव येथे येऊन मानवंदना दिली पाहिजे.

लेखन – अजित दि. देशपांडे ( लेखक संत साहित्य आणी भारतीय पुरातत्व विद्याअभ्यासक आहेत)

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala Accident : लोणावळ्यात तीन कारचा भीषण अपघात, दहा वर्षीय मुलीचा मृत्यू, सात जण जखमी ; रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने संताप

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात ; तहसील कार्यालय वडगाव मावळ याठिकाणी भरता येणार अर्ज

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात ; तहसील कार्यालय वडगाव मावळ याठिकाणी भरता येणार अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.