व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आमचा खंड्या गेला नाही, तो कायम डोळ्यासमोर राहणार’, गाडामालकाने बांधली लाडक्या बैलाची समाधी, दहाव्याला उठल्या पंगती । Maval News

बैलगाडा मालक आणि त्यांचे बैल यांच्यात अत्यंतिक जिव्हाळ्याचं नातं असतं. प्रत्येक गाडामालक आपल्या बैलांवर जीवापाड आणि अगदी पुत्रवत प्रेम करत असतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 20, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल
Mausoleum-Of-Bull-Khandya-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


बैलगाडा मालक आणि त्यांचे बैल यांच्यात अत्यंतिक जिव्हाळ्याचं नातं असतं. प्रत्येक गाडामालक आपल्या बैलांवर जीवापाड आणि अगदी पुत्रवत प्रेम करत असतो. काही ठिकाणी तर जी चीजवस्तू घरातील लेकरांना मिळत नाही, तिही शर्यतीतील बैलांसाठी आणली जाते. त्यांचे उठणेबसणे, खाणेपिणे, राहता निवारा या सर्वांवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं जातं. जेव्हा मालक आपल्या बैलाला इतका जीव लावत असतो, तेव्हा तो बैलही प्रयत्नांची पराकाष्ठा करून शर्यतीत मालकासाठी जीवतोड धावत असतो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जेव्हा हा बैल घाटात विजयी होतो, तेव्हा पंचक्रोशीत बैलासह त्याच्या मालकाचंही नाव गाजत असतं. महाराष्ट्राची ही परंपराच आहे. त्यामुळे बैलगाडा मालक आणि त्यांचा बैल यांच्यातील जिव्हाळ्याची अनेक जगावेगळी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. मावळ तालुका हा देखील बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच तालुक्यात अनेक नामवंत बैल आणि बैलगाडा मालकही आहेत. अशाच एका बैलगाडा मालकाची आणि त्याच्या बैलाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ( Bullock Cart Owner Built Mausoleum Of Bull Khandya Farmer Rahul Jadhav Nanoli Village Maval )

मावळ तालुक्यातील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव हेही बैलगाडा मालक आहेत. त्यांच्या गाड्याचा बैल खंड्या हा तर संपूर्ण पुणे जिल्ह्याला परिचित. परंतू काही दिवसांपूर्वीच या खंड्या बैलाचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. आपला लाडका बैल गेल्याने संपूर्ण जाधव कुटुंब एखादा कर्ता व्यक्ती जावं अशा रितीने दुःखसागरात बुडाला. त्यामुळेच आपल्या या लाडक्या खंड्याची स्मृती कायम आपल्या डोळ्यासमोर राहावी, यासाठी गाडामालक राहुल जाधव यांनी त्याची समाधी बांधण्याची निर्णय घेतला आणि समाधी बांधली सुद्धा.

जाधव कुटुंबियांनी खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्याचा रितसर दशक्रिया विधी केला. दशक्रिया विधीला मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. तसेच त्याच्या पुतळा उभारून समाधीचीही पूजा करण्यात आली. बैलगाडा शर्यतीत खंड्या बैलाने आजवर अनेक विक्रम केले होते. 65 हून अधिक शर्यती त्याने जिंकल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र केसरी असा नावलौकिकही खंड्या बैलाने मिळवला होता. इतकेच नाही तर शेवटच्या क्षणी देखील खंड्या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला होता. परंतू आता हा खंड्या फक्त समाधीरुपी स्मृती बनून सर्वांच्या लक्षात राहणार आहे.

अधिक वाचा –
– Breaking! महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार
– मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan


Previous Post

मनोज जरांगे पाटील रडले, ‘मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं’, पत्रकार परिषदेत जरांगे भावूक

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांतील शेतकरी होणार करोडपती? पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Ring-Road

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांतील शेतकरी होणार करोडपती? पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.