महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुण्यातील 136.8 किलोमीटर लांबीच्या बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी राज्य सरकारकडे आणखी 6,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पुण्यातील बाह्य रिंगरोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला असून आता या दोन्ही भागांत कामाचे बांधकामाचे टप्पेही तयार करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे – सातारा महामार्गावरील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील उर्से ते शिवरे हा 74.08 किमीचा भाग पूर्व रिंगरोडचा भाग आहे. या पूर्व रिंगरोड भागात तर शिवरे ते उर्से परतीचा 65.45 किमीचा वर्तुळाकार रस्ता पश्चिम रिंगरोडचा भाग आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील टप्प्यासाठी आवश्यक असलेली सुमारे 70 टक्के जमीन संपादित केली गेली आहे. तर आता पूर्वेकडील भागात भूसंपादनाला गती मिळाली असून मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील 46 गावांतील जमिनीचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ( Pune Ring Road News Land Acquisition In 6 Villages Of Maval Taluka Farmers will become millionaires )
सध्या मावळ तालुक्यातील वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण या 6 गावांमधून रिंगरोड जाणार असून 73.61 हेक्टर जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहे. या गावांतील जमीनदारांना भूसंपादनापोटी तब्बल 883 कोटी 55 लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहेय. या गावातील बाधित झालेल्या जमीनदारांना भूसंपादन नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे शेतकरी मुदतीत संमती देतील त्यांना 25 टक्के अधिक मोबदला मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले.
असा असणार हा रिंगरोड –
पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी राज्य सरकारने 11,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निधीच्या वितरणानुसार नऊ टप्प्यात बांधकाम होणार आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्हा प्रशासनाला दिली जात आहे. प्रस्तावित रिंगरोड 15,857 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून 30 महिन्यांत तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच संपूर्ण प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रिंगरोडलगत नऊहून अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग आहे. 120 किमी प्रतितास वेगाने वाहनांसाठी डिझाइन केलेला हा नवीन रस्ता 83 गावातून जाणार आहे. आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार असून पाच पॅकेज करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम । Karla Lonavala News
– Breaking! महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार